बोईसर शहरात जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा जल्लोषात होणार साजरा
बोईसर शहरात जगन्नाथ रथयात्रेचा सोहळा जल्लोषात होणार साजरा
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान ; नीलम संखे , ग्रामपंचायत बोईसर उपसरपंच
बोईसर : बोईसर येथे जगन्नाथ रथयात्रा मोठया उत्साहात साजरी होते यावर्षी ही जगन्नाथ मंदिर मंगलमूर्ती नगर बोईसर येथून रविवार दिनांक-७ जुलै रोजी संध्याकाळी ४:०० सुमारास जगन्नाथाची भव्य रथयात्रा निघणार आहे. ह्या रथयात्रेमध्ये तमाम भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व बोईसर चे उपसरपंच निलम संखे यांनी आव्हान केले आहे.
रथयात्रेचे विशेष महत्त्व....
स्कंद पुराणानुसार जो माणूस रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीचा नगरी पोहोचतो तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो. जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. फक्त रथयात्रेत सहभागी झाल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच पुरीच्या जगन्नाथ मंदिरात रथयात्रेची तयारी सुरू झाली आहे. रथयात्रेच्या दिवशी दुर्गापूजेचे आवाहन सुरू होते. कारण रथोत्सवाच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा पूजा केली जाते. परिणामी, रथाच्या दिवसापासून दुर्गापूजेची पंचांगानुसार उलटी गणती व्यावहारिकपणे सुरू होते. रथाची दोरी ओढताच दुर्गा देवीच्या आमंत्रणाचा आवाज घुमू लागतो. रथाच्या दिवसाची सुरुवात खोती पूजनाने होते.
गेल्या १२ ते १३ वर्षापासून मंगलमूर्ती नगर येथून जगन्नाथाची रथ यात्रा निघत असते. ही यात्रा जगन्नाथ मंदिर मंगलमूर्ती ते स्टेट बँक कडून नवापूर रोड मार्गे शिगाव रोड कडून पुन्हा जगन्नाथ मंदिराकडे प्रस्तावना होत असते. ह्या रथयात्रेचे आयोजक मंदिराचे ट्रस्टी सनथकुमार साहू व त्यांची कमिटी करते ,तर यात्रेचे संयोजक शिवसेना उपजिल्हाप्रमुख व बोईसर चे उपसरपंच निलम संखे व त्यांचे पदाधिकारी करतात.
ह्या रथयात्रेमध्ये दरवर्षी दहा ते बारा हजार भाविक सहभागी होत असतात. नवनिर्वाचित निवडून आलेले पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सावरा हे सुद्धा रथयात्रेमध्ये मध्ये सहभागी होणार असल्याचे निलम संखे ह्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment