डोंगरपाडा येथील धांगडा कुटुंबीयांवर संकट : पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मांगणी....
डोंगरपाडा येथील धांगडा कुटुंबीयांवर संकट : पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मांगणी....
डहाणु : डहाणु परिसरात गेल्या आठवडा भर पावसाने जोरदार हजेरी लावली असुन नव नविन घटना समोर येत आहेत. अश्यातच डहाणु तालुक्यातील ग्रामपंचायत धानिवरी मधील डोगंरपाडा येथील एक घर पावसामुळे पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाल्यामुळे सदर कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे.
प्राप्त माहितीनुसार डहाणु तालुक्यातील धानिवरी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथील एक विधवा महिला लाडकी गणपत धांगडा (६५) ह्याचे राहते घर जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे सदर कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.लाडकी धांगडा, तिचा मुलगा व त्याचे संपूर्ण कुटूब शेतीच्या कामासाठी घरा बाहेर गेले असता दि.२ जुलै मंगळवारी सकाळी ८ वाजता दरम्यान त्यांचे घर पूर्णपणे कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र घरातील संपूर्ण साहित्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे धांगडा कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. दरम्यान शासनाने लवकरात लवकर पंचनामे करुन आम्हाला नुकसान भरपाई द्वावी असे धांगडा कुटुंबियांची मांगणी आहे.
◾लोकप्रतिनिधींनी दखल द्यावी पावसामुळे लाडकी धांगडा यांचे घर कोसळल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment