मयंक रमाकांत शिंदे ची विजयवाडा येथे होणाऱ्या नॅशनल तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड
मयंक रमाकांत शिंदे ची विजयवाडा येथे होणाऱ्या नॅशनल तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड
पालघर: नॅशनल ट्रायल रँकिंग साठी अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत मयंक रमाकांत शिंदे यांनी दहा वर्ष खालील गटात राज्यात तिसरी रँक मिळवून ब्राँझ पद मिळवले.
महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन मार्फत अमरावती येथे घेण्यात आलेल्या नॅशनल ट्रायल रँकिंग मध्ये मयंक रमाकांत शिंदे याने दहा वर्ष खालील गटात राज्यात तिसरी रँक मिळवून ब्राँझ पद मिळवले आहे. यासाठी त्याला वसई येथील अंतरराष्ट्रीय कोच गौरव पाटील आणि आर्चरी असोसिएशनचे सचिव सावे ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे आता त्याची विजयवाडा येथे होणाऱ्या नॅशनल आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून पालघर चे नाव देशात करण्याचा मनोदय मयंक शिंदे ने व्यक्त केला आहे. त्यामुळे मयंक रमाकांत शिंदे याने केलेल्या उत्तम कामगिरी बाबत सर्व स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment