न्यू बृजवासी दुकानातील खाद्य पदार्थ ठरू शकतात आरोग्यासाठी हानिकारक
न्यू बृजवासी दुकानातील खाद्य पदार्थ ठरू शकतात आरोग्यासाठी हानिकारक
बोईसर | बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील नवापुर नाका येथील मुख्य रस्त्यालगत असलेले नामांकित न्यू बृजवासी ह्या दुकानामध्ये तयार केलेल्या खाद्य पदार्थात मेलेली माशी आढळून आली आहे.
न्यू बृजवासी हे एक बोईसर मधील नामांकित दुकान मानले जात आहे. परंतु आरोग्याच्या बाबतीत ह्या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची उपायोजना असल्याचे दिसून येत नाही. हे दुकान म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे असे म्हणणे वावगं ठरणार नाही.
मागील काही दिवसापूर्वी जनता स्वीट अँड ड्रायफूट या दुकानात झुरळ तसेच माशा ताव मारताना दिसत होत्या, तसेच सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथिल अलसिफा गल्लीत न्यू गौसिया बेकरीत तसेच इतर बेकऱ्या मध्ये ही खाद्य पदार्थ तयार करताना अन्नसुरक्षा व औषध सुरक्षा विभागाची व बेकरी संबंधित असणाऱ्या कुठल्याही विभागाची परवानगी घेतलेली नसून, निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ तयार केले जात आहेत. तसेच सिडको येथे राहत्या घरामध्ये तीर्थराज यादव ह्याने निकृष्ट दर्जाचा मावा बनवून लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या . परंतु अन्नसुरक्षा व औषध सुरक्षा पालघर विभागातील अधिकारी गोड मिठाई खाऊन सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याने त्यांच्यावर निकृष्ट खाद्य पदार्थ खाणाऱ्या जनतेकडून संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अन्नसुरक्षा व औषध सुरक्षा पालघर विभागातील अधिकारी अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देत आहे का ? असा देखील प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
न्यू बृजवासी हे नामांकित दुकानांमध्ये स्वच्छता व इतर सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असताना संबधित अधिकारी या कृत्यांना आटोक्यात आणणार की बघ्याची भूमिका बजावणार?
Comments
Post a Comment