नवरा फिरायला घेऊन जात नाही याचा राग मनात धरुन साडेचार महिन्यांच्या मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
नवरा फिरायला घेऊन जात नाही याचा राग मनात धरुन साडेचार महिन्यांच्या मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
पालघर : कासा पोलीस ठाणे हद्दीत साडेचार महिन्याच्या मुलीची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा जयेश राजड अस आईचे नाव असुन मुलीचे नाव अनुश्री आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डहाणु तालुक्यातील शिसणे शिपाई पाडा येथे दि.7 रोजी एका महिलेने आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना परिसरात घडली आहे. जयेश राजड हा शिसने येथील रहिवाशी असून जयेश फिरायला जात असताना आपल्याला नेत नाही याचा राग मनात धरून पत्नी मनीषा राजड (वय 23) हिने आपल्या पोटच्या साडेचार महिन्यांची चिमुकली अनुश्रीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मनीषा हिने स्वतः राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून चिमुकलीची हत्या करुन आईने स्वत:ला संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment