बोईसर रेल्वे फाटकावर नशेत धुंद रुस्तम सिंग व अशोक सिंग यांनी बस चालक व वाहकास बेदम मारहाण
बोईसर रेल्वे फाटकावर नशेत धुंद रुस्तम सिंग व अशोक सिंग यांनी बस चालक व वाहकास बेदम मारहाण
मारहाणी मुळे सेंट फ्रांसिस शाळेतल्या मुलांनमध्ये व आजूबाजूच्या लोकांनमध्ये भीतिचे वातावरण
आज दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान फाटक क्रमांक ५२ वंजार वाडा येथून सेंट फ्रान्सिस शाळेतील विध्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अडवून दारूच्या नशेत टूण असलेल्या दोन इसमाने चालकाला बेदम मारहाण केली आहे. रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी झालेली असताना बसचा धक्का लागल्याने संतप्त झालेल्या दुचाकी स्वार रूस्तम संतोष सिंह व अशोक जगदीश सिंह यांनी बस चालक विवेक अरविंद धोडी व वाहक अविनाश नारायण करबट या दोघांना बेदम मारहाण केलेली आहे.
दरम्यान सेंट फ्रान्सिस शाळेतील विध्यार्थ्यांना घेऊन जाणारे बस चालक व वाहक दारूच्या नशेत टूण असल्याचे दिसून आले तर अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ रेल्वे फाटक रोखून धरण्यासाठी भाग पाडणाऱ्या रूस्तम सिंह व अशोक सिंह यांनी कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवत रस्त्यावर जाणाऱ्या महिलांना व लहान मुलांना खाली पडेपर्यंत बस चालकाला मारहाण केल्याची व्हिडिओ हाती आलेला असून गर्दीचा फायदा घेत बस चालकाचा मोबाईल बसमधून लंपास करताना अशोक सिंह याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसून आले तर पोलीस निरीक्षक शिरीश पवार यांना दुरध्वनी द्वारे संपर्क करून माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठवून अडवून ठेवलेली विध्यार्थ्यांसहित बसची सुटका करत विध्यार्थ्यांना घरपोच केल्यानंतर आरोपींना अटक केलेली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment