राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालघर जिल्हा बैठक बोईसर येथे झाली संपन्न

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालघर जिल्हा बैठक बोईसर येथे झाली संपन्न 

दादा, भाऊ, तात्या यांचे होर्डिंग लावण्यापेक्षा महापुरुषाचे पुतळे व स्मारक बनवा - राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर


बोईसर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 10 डिसेंबर 2023 रोजी प्रदेश उपाध्यक्ष उदय कुमार आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बोईसर येथील डॉनबोस्को शाळेत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी प्रदेश चिटणीस वैशालीताई जवंजाळ, प्रदेश चिटणीस  पंजाबराव देशमुख, प्रदेश सचिव संतोष मराठे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड , बोईसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा सरचिटणीस किसन जाधव,  सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष नितीन जाधव,  पालघर तालुकाध्यक्ष संदेश पाटील, पालघर उपाध्यक्ष राहुल ठाकुर,  पालघर तालुका उपाध्यक्ष पावाजी गोवरी, तलासरी तालुकाध्यक्ष अजित चव्हाण,गणेश धोडी, रवी संखे, विठोवा मराठे, देविदास मराठे सुनील मराठे, सरावली ग्रामपंचायत सदस्य परदेशी व इतर अधिकारी व कामगार तसेच हजारो स्त्री-पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे कार्यकर्त्यांनी फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले यात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष मराठे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातील अनेक लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोड, तालुकाध्यक्ष संदेश पाटील, प्रदेश सरचिटणीस वैशाली ताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा अजित पवार गट तट काही नाही तो एकच पक्ष आहे आणि तो सन्माननिय अजितदादा पवाराचा त्यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली भारतभर चालवणार तसेच आमच्या मुलांचे भविष्य, आपल्या भागातील पर्यावरणाचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा समस्या अशा अनेक सार्वजनिक समस्या कशा सोडवता येतील यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काम करायचे आहे, ही सभा कुणालाही आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान बनवण्यासाठी नाही. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील गोरगरिबांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न  सोडविण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील. तसेच खोट्या,नाट्या, लोकांनचे बोर्ड, होडिंग लाउन त्यांनी किती भ्रष्टाचार केलेय, त्यांनी काय काय केलेय हे न पाहता दादा, भाऊ, तात्या यांचे होर्डिंग लाउन प्रश्न सूटणार नाही कारण आपण ज्याच्या साठी जगतो त्यांच्या समोर कोणाचे आदर्श ठेवणार यासाठी बोईसरमध्ये महापुरुषांचे पुतळे व स्मारक बनवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. ज्याने येणाऱ्या पिढीला शिकता यावे, असे सांगून अजित पवार यांनी देशहितासाठी, विकासासाठी व लोकांना न्याय देण्यासाठी भाजपसोबत युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी सार्थ ठरवला.  व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक प्रदेश सचिव संतोष मराठे यांचे कौतुक केले.

यावेळी इतर पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन गव्हाणे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी