अवधनगर येथील सरकारी भूखंडावरील अतिक्रमणांवर होणार तोडक कारवाई
अवधनगर येथील सरकारी भूखंडावरील अतिक्रमणांवर होणार तोडक कारवाई
बोईसर : सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण होण्याचे भरपूर प्रकार समोर येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि जागेचा मिळणारा उत्तम भाव यासाठी भूमाफिया आता सरकारी जमीनी बळकावुन त्या भूखंडावर अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू केले आहेत. अश्यात रामयज्ञ रामप्याचे प्रजापती, ताराचंद लखपत गुप्ता व जयेश हरिश्चंद्र भारंबे यांनी केलेल्या बांधकामे निष्कासित करण्यासाठी तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लेखी आदेश दिले आहेत.
सविस्तर बातमी अशी की, मौजे सरावली सरकारी सर्वे नंबर - १००/२६ या भूखंडावर रामयज्ञ रामप्याचे प्रजापती व ताराचंद लखपत गुप्ता यांनी इमारतीचे बांधकाम केले आहे . तर मौजे सरावली सरकारी सर्वे नंबर - ९५/१ या भूखंडावर जयेश हरिश्चंद्र भारंबे यांनी ठेकेदार अण्णा मूकनर या ठेकेदारांकडून दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असताना आदिवासी कामगार कृष्णा वंशा खोडगा याचा उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येत जागीच मृत्यू झाला होता.
या प्रकरणी तहसीलदार रमेश शेंडगे यांनी हे सर्व बांधकामे निष्कासित करण्यासाठी मंडळ अधिकारी बोईसर व तलाठी सजा सरावली यांना माहे सप्टेंबर महिन्यात लेखी आदेश दिलेले असून ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण पुढे करत सदर बांधकामे निष्कासित करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने तहसीलदार रमेश शेंडगे या प्रकरणी दखल घेत सरकारी भूखंडावरील बांधकामांवर हातोडा मारणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान अणुऊर्जा प्रकल्प बाधितांना मौजे सरावली अवधनगर परिसरातील भूखंड वाटप करण्यात आला होता. त्यापैकी काही प्रकल्प बाधित लोकांनी जमीनीचे वाढते भाव पाहता परप्रांतियांना परस्पर विक्री केलेले भूखंड शर्तीचा भंग केल्या प्रकरणी शासन दरबारी जमा झालेले असून सदर भूखंड फक्त कागदोपत्री जमा झालेले असून आजरोजी शासन दरबारी जमा झालेल्या त्या भूखंडावरील बांधकामांत अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. तरी पालघरच्या तहसीलदारांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित करून शासनदरबारी कागदोपत्री जमा असलेला भूखंड प्रत्यक्षात शासनदरबारी जमा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मौजे सरावली सरकारी भूखंडावर सुरू असलेले बांधकामे निष्कासित करण्यासाठी तहसीलदार यांनी लेखी आदेश दिले आहे. येत्या काही दिवसांत तोडक कारवाई कार्यक्रम हाती घेतले जाईल - मनिष वर्तक - मंडळ अधिकारी बोईसर
Comments
Post a Comment