बोईसर परिसरात खुलेआम होतेय गांजाची विक्री
बोईसर परिसरात खुलेआम होतेय गांजाची विक्री
बोईसर : शहरात गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा विक्री जोरात सुरू आहे. गांजाची खुलेआम विक्री करून बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. गांजा हा सहज उपलब्ध होऊ लागला असल्यामुळे गांजाची विक्री सर्रास होत आहे. त्यामुळे बरेच लोक या नशेच्या आहारी जात आहेत.
अश्याच खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीतील जैन मंदिरा शेजारी रेल्वेच्या ट्रक टर्मिनल च्या राखीव जागेत अनधिकृत बांधकाम करून मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु असून, त्या ठिकाणी अम्लीय पदार्थांची विक्री, तसेच जुगार खेळणे,आणि रस्त्यावर उभे राहून वेश्या व्यवसाय असे अनेक अवैध धंदे सुरू असल्यामुळे यशवंत सृष्टी तसेच परिसरातील सभ्य नागरिकांना या भागातून वावरताना लज्या उत्पन्न होईल अशी परिस्थिती या भागात निर्माण झालेली आहे.
तसेच अम्लीय पदार्थ सेवन करणारे या भागातून पादचारी नागरिकांना ब्राऊन शुगर, गांजा, चरस सेवन करणाऱ्या नशेडी लोकांकडून जबरदस्ती लुटण्याचा प्रयत्नही कित्येकदा घडला आहे. या ठिकाणी निलेश सुर्वे नावाचा इसम हे अवैध कृत्य करत असून रेल्वे प्रशासनाला हाताशी धरून अनेक गुन्हे दाखल असताना देखील निल्याच्या अवैध कृत्यांना प्रशासन पाठबळ देत आहे का ? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment