रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक बोईसर पोलीसांनी घेतला ताब्यात
रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक बोईसर पोलीसांनी घेतला ताब्यात
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यातून रसायनयुक्त घनकचरा वाहून नेणारा ट्रक बोईसर पोलिसांकडून रात्री उशिरा गजाआड करण्यात आला आहे. प्रदुषणाबाबत तारापूर औद्योगिक वसाहत अशा काही कारखान्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पुढाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाते परंतु जेंव्हा एखादा पुढारीच या अवैध कृत्यांना खतपाणी घालतो त्यावेळी बोंबाबोंब करणारे पुढारी आता काय भूमिका घेणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा रसायनयुक्त घनकचरा महामार्गावरून पुढे निर्जन स्थळी बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची खबर बोईसर पोलिसांना मिळाल्यानंतर मुकट टॅंक या नाक्यावर ट्रक क्रमांक GJ 36 X 0092 या क्रमांकाचा ट्रक गजाआड करण्यात आला आहे.
सदर रसायनयुक्त घनकचरा वाहतूक करणारा ट्रक बेकायदेशीर घातक घनकचरा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास येताच भा दं स कलम २६८, २७८, ७, ९, १५ अशा प्रकारे वाहान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणीकेरी करत आहेत.
दरम्यान रासायनिक घनकचरा बेकायदेशीरपद्धतीने विल्हेवाट लावणारी टोळकी मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून अशा अवैध कृत्यामुळे परिसरातील गावातील पिण्याचे पाणी दुषित होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुध्दा कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे केमिकल माफियांचे फावत आहे असे जनतेतून बोललं जात असताना सरावली ग्रामपंचायतीचा एका विद्यमान सदस्याच्या सांगण्यावरून गणेश बॅंन्जो या कारखानचा रसायनयुक्त घनकचरा बेकायदेशीरपद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा ट्रक घेऊन जात असल्याचे बोललं जात आहे.
◼️ सदर प्रकरणी नमूने गोळा करण्यात आलेले असून अहवाल येताच उचित कार्यवाही केली जाईल : राजू वसावे - उपप्रादेशिक अधिकारी म.प्र.नि.मं तारापूर १
Comments
Post a Comment