महावितरणचा भोंगळ कारभार ! बोगस कागदपत्राच्या आधारावर राहुल गुप्ताला विज जोडणी...
महावितरणचा भोंगळ कारभार ! बोगस कागदपत्राच्या आधारावर राहुल गुप्ताला विज जोडणी...
बोईसर : महावितरण कंपनी नविन कनेक्शनसाठी घर जागेचा उतारा किंवा टॅक्स भरलेली पावती, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड, महावितरण’चा ए-वन अर्ज तसेच ऑनलाइन अर्ज अशी सर्व कागदपत्राची आवश्यकत असतानाही महावितरण कंपनीकडून कागदपत्रांची छाननी न करताच बोगस कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी जोडून दिल्याचे निदर्शनास आले आहे.
मौजे बोईसर सर्वे नंबर ३० या वनपट्टा पैकी काही क्षेत्र भूमिहीन आदिवासी नागरिकांना कसून खाण्यासाठी ३६-३६ अधीन राहून वाटप करण्यात आलेला असून आदिवासी नागरिकांच्या गरिबीचा फायदा घेत काही परप्रांतीयांनी चाळीचे बांधकाम सुरू केलेले असून महावितरण कंपनीकडून कागदपत्रांची छाननी न करताच बोगस कागदपत्रांच्या आधारावर चिरीमिरीत राहुल गुप्ता या नावाने वीज जोडणी जोडून दिल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व नाहरकत दाखला घेणे आवश्यक असून महावितरण कंपनीकडून असे दाखले न घेताच बोगस आधार कार्ड व बोगस नोटरीच्या आधारावर वनपट्टाच्या जमिनीवर परप्रांतियांना वीज जोडणी लावून दिल्यामुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे .
Comments
Post a Comment