आलेवाडी गावातील पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते झाले संपन्न.
आलेवाडी गावातील पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते झाले संपन्न.
पालघर : पालघर तालुक्यातील आलेवाडी गावातील पिण्याचे पाणी साठा करण्यासाठी टाकी बांधकाम कामाचे भूमिपूजन दि.२२/१२/२०२३ गुरुवार रोजी पंचायत समिति पालघर उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
लोकसंख्येत वाढ झाल्याने येथील जनतेला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने जनतेला नेहमीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी आलेवाडी ग्रामपंचायतीकडून मांगणी केल्यानंतर उपसभापती मिलिंद वडे यांच्या प्रयत्नातून १५ वित्तीय आयोगातून या पाणी साठा करणाऱ्या टाकीचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे आता गावातील ग्रामस्थाना अनेक वर्ष भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्ना पासून लवकर त्यांची सुटका होणार आहे.
यावेळी पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती अभियंता शिरसेकर , ग्रुप ग्रामपंचायत आलेवाडी गुंदवली चे सरपंच राजेंद्र वाडीकर, उपसरपंच सतीश ठाकुर, ग्रामसेविका अल्पना पाटील, आलेवाडी शिवसेना शाखा प्रमुख सागर वाडीकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते .
Comments
Post a Comment