बोईसर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या बदलीने सर्वत्र खळबळ
बोईसर पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या बदलीने सर्वत्र खळबळ
बोईसर : बोईसर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची बुधवारी रात्री उशिरा तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे अजुनही या बदलीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही त्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे तरी उमेश पाटील यांच्याकडे पालघर कंट्रोलचा कार्यभार देण्यात आला आहे.
तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्याजागी उमेश पाटील यांना सहा महिन्या पूर्वीच बोईसर पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला होता . गेल्या वर्षभरात शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच अवैद्य धंद्याचे वाढते प्रमाण रोखण्यात पाटील यांना बऱ्यापैकी यश आले होते.मात्र बुधवारी रात्री त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याने सिस्टमचे बळी पडल्याची सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सोन्याचा धुर निघणाऱ्या एमआयडीसीचा भाग असलेल्या या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची चढाओढ लागलेली असते मात्र त्या सिस्टमच्या कार्याला वाहून न घेतल्याने तसेच पोलीस ठाण्यात विविध क्षेत्रातील दलालांना नो एंट्री दिल्यानेही पाटलांच्या बदलीचे कारण असल्याची माहिती समोर येत आहे. पाटील यांच्या बदलीमुळे पोलिस दलासह बोईसर शहरांत एकच खळबळ उडाली असून बदली मागची विविध कारणे असल्याचीही चर्चा सुरु आहे.
मागील दीड ते दोन वर्षात तीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा बोईसर पोलीस ठाणे चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे पुन्हा चढाओढीत कुणाची वर्णी सोन्याच्या धूर सोडत असलेल्या पोलीस ठाण्यात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment