जिंदाल कारखान्यातील मनोहर वाणी या कामगाराचा संशयास्पद मृत्यू...! नातेवाईकांचा आक्रोश
जिंदाल कारखान्यातील मनोहर वाणी या कामगाराचा संशयास्पद मृत्यू...! नातेवाईकांचा आक्रोश
बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील जिंदाल कारखान्यात प्लॉट.नं. B-6 या कारखान्यात मनोहर भास्कर वाणी (वय 45 वर्ष) या कामगारांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिनांक १० डिसेंबर रोजी मनोहर वाणी हे रात्री ११ वाजेच्या रात्र पाळीवर कामाला गेलेल्यानंतर त्यांची मृत्यू झाल्याची बातमी सहकारी कामगारांकडून नातेवाईकांना कळविल्यानंतर दुःखाचे डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांनी कंपनी गाठल्यानंतर पाहिले तर नातेवाईकांना न कळवताच कंपनीकडून मृतदेह
तारापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता. सदर मृतदेह कंपनीमध्येच दोरीला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आलेला असून नातेवाईकांना न कळवताच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेल्यामुळे कामगार मनोहर वाणी यांची हत्या कंपनीकडूनच करण्यात आल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहे.
दरम्यान नामवंत जिंदाल कारखान्यात मनोहर वाणी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजलेली असून बोईसर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
Comments
Post a Comment