क्रांती - ज्योत दिव्यांग विकास संस्थेकडून जागतिक अपंग दिन बोईसर येथे केला

क्रांती - ज्योत दिव्यांग विकास संस्थेकडून जागतिक अपंग दिन बोईसर येथे केला मोठ्या उत्साहात साजरा


बोईसर : दिनांक ७ डिसेबंर रोजी क्रांति ज्योत दिव्यांग विकास संस्था यांच्या सयुंक्त माने जागतिक दिव्यांग दिन कृतज्ञता समारंभ कार्यक्रम टाकी नाका टिमा हॉल, एमआयडीसी बोईसर येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतामध्ये सन १९९१ रोजी राष्ट्रीय दिव्यांग पुनर्वसन परिषद कायदा तयार करण्यात आला. यानुसार अपंग व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, संघटना व सरकारसाठी काही नियमावली करण्यात आली. जागतिक दिव्यांग दिन मार्च महिन्यातील तिसऱ्या रविवारी ऐवजी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच दिवस असावा म्हणून १९९२ रोजी संयुक्त राष्ट्र संघटना व जागतिक आरोग्य संघटना यांनी ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग व्यक्तीबद्दल सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने म्हणून साजरा करण्याचे ठरविले.



जागतिक अपंग दिनाचा उद्देश सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पैलूंमध्ये अपंग लोकांच्या दु:खाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि समाजाच्या आणि विकासाच्या सर्व स्तरांवर त्यांचे हक्क आणि कल्याण यांचा प्रचार करणे हा आहे. हा दिवस दरवर्षी पाळणे, अपंग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या जीवनातील सर्व क्षेत्रांतील अडथळ्यांपासून मुक्तपणे जगू शकतील आणि समाजात मुक्तपणे, समानतेने आणि प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील याची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते.


"समावेशक विकासासाठी परिवर्तनात्मक उपाय: प्रवेशयोग्य आणि न्याय जगाला चालना देण्यासाठी नाविन्याची भूमिका." या दिवशी, दिव्यांग लोकांना जगभरात भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता वाढवून अधिक सुलभ आणि टिकाऊ जग निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवूया. या जागतिक अपंग दिनानिमित्त, अपंग व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जगाला संदेश देऊ या जे नवीन शक्यतांच्या निर्मितीला प्रतिसाद देण्यासाठी सक्रियपणे योगदान देऊ शकतात.

अपंगत्व समजून घेणे अपंगत्व ही एक शारीरिक किंवा मानसिक स्थिती (अशक्तता) आहे जी एखाद्या व्यक्तीसाठी विशिष्ट कार्ये हाती घेणे आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधणे अधिक कठीण करते. अपंगत्वाचे अनेक प्रकार आहेत, ज्यात एखाद्या व्यक्तीला प्रभावित करणार्‍या व्यक्तींचा समावेश आहे.

ह्यातच बोईसर येथील "क्रांती ज्योत दिव्याग विकास संस्था "ही नेहमीच दिव्यागाच्या पाठीशी खंबीर पणे उभी असते.

ह्यांनीच सर्वांनी ह्या ७ डिसेंबर गुरुवार टीमा हॉल बोईसर एमआयडीसी येथे 'जागतिक अपंग दिनाच्या दिवशी 'पालघर मधील सर्व अपंग बंधू भगिनींना या कार्यक्रमास बोलवण्यात आले. तसेच ह्या संस्थेने बोईसर पालघर मधील नामवंत प्रतिनिधींना आमंत्रित करून ह्यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमास उपस्थित बांधवांना भेट वस्तू व सन्मान चिन्ह व प्रशस्थी पत्रा द्वारे सन्मान करण्यात आला .


यावेळी आलेल्या प्रमुख  पाहुण्याचा संतोषी संगारे,भावसार साहेब, डॉ.विश्वास वळवी, जनार्दन चांदणे, रफिक सोलंकी, जकिर भाई, अजित राणे, सपना ताई प्रभू, आनंद धोडी,उमेश नाईक, विवेक वडे,लोकरे साहेब, व प्रत्रकार देवेंद्र मेश्राम, संतोष राणे, सुशांत संखे, स्वप्नील पिंपळे ह्या सर्वांचा " क्रांती ज्योत दिव्यांग संस्थेने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यात संस्थेतर्फे चहा नाष्टा व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.


क्रांती- ज्योत दिव्यांग विकास संस्थे हि  दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने ही संस्था कार्य करत आहे . तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे तसेच जागतिक दिव्यांग दिना निमित्त  प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या अडचीनी जाणून घेऊन त्याचे प्रश्न सोडवण्या साठी हा जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनीं या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या संस्थेवर जो विश्वास दाखवला आहे त्या बद्दल संस्थेच्या अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच संघटनेचे पदाधिकारी विलास भोणे, शाम गायकवाड , सोहनलाल राठोड ,किशोर पाटील, संजय भानुशाली ,अविनाश म्हात्रे, कैलास तांडेल, फकिरा पवार व दानशुर व्यक्ति यांचे ही आभार मानण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन हे रविंद्र जाधव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी