मीच उपसरपंच असल्याची बतावणी करणारा ग्रामस्थांना गंडवुन बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देण्याऱ्याला ग्रामस्थ देणार का निवडून
मीच उपसरपंच असल्याची बतावणी करणारा ग्रामस्थांना गंडवुन बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देण्याऱ्याला ग्रामस्थ देणार का निवडून....
बोईसर: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढत असताना मतदारांना आकर्षित करणारी वेगवेगळी आश्वासने व फसवे वायदे करणाऱ्या उमेदवारांचा सुळसुळाट सुरू आहे.
खैरेपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत देखील मीच उपसरपंच असल्याची बतावणी करून अनेक ग्रामस्थांना गंडवणारा पुन्हा एकदा निवडणूकीत भाग घेऊन मतदारांना फसवे वायदे करून सरपंच होणार का असा थेट आरोप माजी उपसरपंच हितेश संखे यांनी थेट सरपंच पदाचे उमेदवार संतोष पावडे यांच्यावर केले आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी सदस्य असताना पावडे यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण दिले होते तर घरपट्टीत वाढ करण्यासाठी पावडे यांनीच आग्रह धरला होता असे देखील संखे यांनी सांगितले आहे.
संपूर्ण बोईसर सहित हॉटेल व्यावसायिकांचा घनकचरा बनलेल्या खैरापाडा हद्दीतील कचराभूमीचे संगोपन ग्रामपंचायत खैरापाडा करत असून या सर्व परिसरातील अवैध घनकचऱ्या मुळे ग्रामपंचायतीवर अतिरिक्त भार पडत आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून हा भूखंड ग्रामपंचायतीला वर्ग करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील संखे यांनी सांगितले आहे.
संतोष पावडे यांना जणू काही एक दृष्टांतच पडला होता की त्यांनी गोर गरिबांना कर्दनकाळ ठरलेली शेतकरी संघर्ष समिती तयार करून भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना हाताशी धरून पत्र्याची असलेली घरे आरसीसी दाखवून मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवचा करोडोचा मलिदा संतोष पावडे कुटुंबियांना कडून लाटलेला आहे आणि तोच करोडो रुपयांचा पाऊस खैरापाडा मतदारांवर पाडण्याचा प्रयत्न आज केला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
Comments
Post a Comment