दिवंगत प्रिया प्रविण संखे यांच्या स्मृतिदिना निमित्त निराधार वृद्धांना दिला मायेचा आधार

दिवंगत प्रिया प्रविण संखे यांच्या स्मृतिदिना निमित्त निराधार वृद्धांना दिला मायेचा आधार 

संस्थेच्या माध्यमातून पुण्याईचं काम प्रविण संखे करत आहे - शिरीष नाडकर्णी



बोईसर : दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तारापूर येथे दिवंगत प्रिया प्रविण संखे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त तारापूर जवळील कामोडा येथील बाल विकास महिला मंडळ संचालित सिद्धी वृद्धाश्रम येथे वृद्ध आजी आजोबांना कांबळ व फळ वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाले.


याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मे. डी डेकोर होम फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर शिरीष नाडकर्णी , रा.ही. सावे विद्यालय तारापूर येथील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक संपत वैराळ , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघर जिल्हा समन्वयक मेघना वैराळ, संस्थेचे अध्यक्ष व बोईसर ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रविण संखे , महिला आर्थिक विकास महामंडळ बोईसर व्यवस्थापक रुपाली कोळेकर , स्थानिक जनविकास प्रतिष्ठान बोईसर महिला अध्यक्षा बेबीताई सानप व मुंबई बेस्ट बस सेवा कर्मचारी अनिल सानप उपस्थित होते.  

यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे शिरीष नाडकर्णी म्हणाले की मी एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये व्यवस्थापक असून कंपनीतील कामगारांना मार्गदर्शन व पाठिंबा देणे हे माझं प्रमुख कार्य आहे परंतु अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या माझे मित्र प्रविण संखे यांनी त्यांच्या पत्नीच्या तीव्र दुःखद निधनानंतर न खचता व डगमगता गोरगरिबांसाठी व वृद्धांसाठी सातत्याने सुरू केलेला सामाजिक कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रवीण संखे यांच्या कुटुंबाशी माझे घरोब्याचे प्रेमळ संबंध असून दिवंगत प्रिया वहिनी या खूप सोज्वळ व भोळ्या स्वभावाच्या होत्या. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती व चिरशांती देवो अशी विनम्रतापूर्वक श्रद्धांजली शिरीष नाडकर्णी यांनी वाहिली. वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध आजी-आजोबांना उबदार कांबळ व फळ वाटप करून व त्यांचा आशीर्वाद आत्मसात करून संस्थेच्या माध्यमातून पुण्याईचं काम प्रविण संखे यांनी केले आहे. असे गौरवोद्गार नाडकर्णी यांनी याप्रसंगी काढले. 



सावे विद्यालय तारापूर येथील शिक्षक संपत वैराळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज या कार्यक्रमातील निराधार वृद्ध आई-बाबांना पाहून मला माझ्या स्वतःच्या आई-वडिलांची आठवण होत आहे. कारण माझे आई वडील या जगामध्ये नाहीत, आज मला तुम्हाला पाहून माझ्या आई-वडिलांची आठवण होत आहे. देव हे आपल्या घरातच असतात आणि आपले आई-वडील हेच खरे आपले दैवत असतात आणि प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची पूजा आपल्या हृदय मंदिरात करावी, असे भावनिक उद्गार वैराळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले.



पालघर जिल्हा समन्वयक मेघना वैराळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्थानिक जनविकास प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था प्रत्येक महिन्यात गोरगरिबांसाठी काही ना काही वेगवेगळ्या स्वरूपाचे सामाजिक कार्य करीत आहे. हेमंत कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी प्रवीण संखे सर यांनी केलेले कार्य खरोखरच खूप मोठं असून त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य व योगदान विविध विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा आणि मार्गदर्शनपर ठरले आहे. बोईसर ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच असताना प्रवीण संखे यांनी बोईसर वासीयांसाठी शहरातील अनेक विकास कामे व नळ पाणीपुरवठा योजनेची कामे खरोखरच खूपच सुंदर व अप्रतिम होते.


 
स्थानिक जनविकास प्रतिष्ठान मध्ये आज १७० महिला या सामाजिक संघटनेमध्ये असून अध्यक्ष प्रवीण संखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध विकास कामे महिलांसाठी उल्हासाने व आनंदाने करीत आहोत. मेघना वैराळ पुढे म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी माझं सामाजिक कार्य महिला सक्षमीकरणासाठी करत असून आजचा हा वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांसाठी आयोजित कांबळ व फळ वाटपाचा कार्यक्रम खरोखरच नेत्र दीपक व अलौकिक आहे. 

याप्रसंगी स्थानिक जनविकास प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष बेबी सानप यांनी सुंदर व भावपूर्ण आपल्या भाषणातून सुंदर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते २२ वृद्ध आजी आजोबांना कांबळ व फळाचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विजय यांचे खास स्वागत व आभार संस्थेचे अध्यक्ष प्रवीण संखे यांच्याकडून करण्यात आले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक विशाल पिंपळे व तुषार पिंपळे यांनी खास परिश्रम घेतले. सदरचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी दोन मिनिटं शांत व स्तब्ध उभे राहून दिवंगत सौभाग्यवती प्रिया प्रविण संखे यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वृद्धाश्रमात वाहण्यात आली. वृद्धाश्रमातील सर्व निराधार आजी आजोबांनी कैलासवासी हेमंत संखे शिक्षण संस्थेचे अगदी मनापासून आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी