शेट्टीच्या ब्लूजेंट रेसिडेंसि हॉटेलवर प्रशासन मेहेरबान का?
शेट्टीच्या ब्लूजेंट रेसिडेंसि हॉटेलवर प्रशासन मेहेरबान का?
बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक १३१/१ प्रकाश महाबल शेट्टी यांनी बोईसर ग्रामपंचायतीकडून मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती कामी ना हरकत दाखला घेत प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून चार मजली इमारत उभी करत शासनाची तिजोरी खाली करून स्वतःची तिजोरी कशी भरता येईल म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे देखील नियम धाब्यावर बसवून २३ खोलीचे लॉजिंग तयार केले आहे.
नवापूर नाका येथील गजबजलेल्या लोक वस्तीत अगदी जिल्हा परिषद शाळे समोरच चार मजली इमारतीत असलेल्या ब्लूजेंट रेसिडेंसि बेकायदेशीर हॉटेल सुरू असून यात
हातभार जवळ असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाला देखील या बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम सुरू असताना अनेक तक्रारी प्राप्त होऊन देखील आजरोजी ठोस कारवाई करता आलेली नसल्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कामकाजावर आच्छर्य व्यक्त केले जात आहे.
यात शहरातील वाढते प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई देखील केली जाते वेळीच असे उध्योजकांचे वीज जोडणी व पाणी जोडणी बंद करण्याचे आदेश देण्यात येत असताना मात्र ग्रामपंचायतीकडून घर दुरूस्तीच्या नावाने ना हरकत दाखला घेऊन जिल्हा प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता चार मजली इमारत उभी करून २३ खोल्यांमध्ये लॉजिंग सुरू करणाऱ्या शेट्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखील कसेंट घेतली असल्याचे निदर्शनास येत नाही.
सदर प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून m/s Blugent Residency, नवापूर रोड बोईसर (पश्चिम) ता व जिल्हा -पालघर या व्यवसायाला दिनांक २४/७/२०२३ व दिनांक ३०/१०/२०२३ रोजी थातूरमातूर कारणे दाखवा नोटीस बजावून शेट्टी यांच्या या बेकायदेशीर व्यवसायाला पाठीशी घालत तर नाही ना...? २३ खोलीत सुरू असलेल्या लॉजिंग मधून निर्माण होणारा मलमुत्र सांडपाणी नेमका जातो कुठे ? शासनाची परवानगी न घेता सूरू असलेल्या या व्यावसायिकांने मार्जिनल स्पेसमधे एक इंच देखील जागा न सोडता निर्माण केलेल्या या इमारतीत मलमुत्र सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी HTP प्रक्रिया केंद्र आहे तरी कुठे ? नसेल तर पुढील नियोजन कसे असणार ? या बेकायदेशीर व्यवसायाला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कसेंट देऊन व्यवसाय सुरू ठेवणार का ? इतर उद्योगाप्रमाणे या व्यवसायाला देखील वीज जोडणी व पाणी जोडणी बंद करून व्यवसाय बंद करण्याचे आदेश देणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या पुढील कार्यवाही बाबत शंका व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment