मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोंडस नावाखाली आप्पा करतोय फसवणूक ; जिल्हाप्रमुखांचा छुपा समर्थन...?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोंडस नावाखाली आप्पा करतोय फसवणूक ; जिल्हाप्रमुखांचा छुपा समर्थन...?
शिवसेनेचा स्वयंघोषित युवानेता आप्पा मारतो थापा ; गरजवंताला लुबाडून करतोय दणक्यात साजरी दिवाळी
पालघर : शिंदे सरकार सत्तेवर येताच पालघर जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी फसवणुकीचा अक्षरक्ष धंदा सुरू केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाचा वापर करीत कामे करून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक सुरू आहे. बोईसर मधील शिंदे गटाचा स्वयंघोषित युवा नेता सौरभ आप्पा नावाच्या वादग्रस्त कार्यकर्त्याकडून अशाच प्रकारे एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असुन याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु काही राजकीय दबावामुळे पोलिसांसोबत हितसंबंध असलेले नेते मंडळी यांनी सौरभ आप्पा ला लपवून ठेवण्यात यश आले होते. असे चित्र बोईसर येथे दिसण्यात आले. तर राजकीय दबावामुळे अनेक गोरगरिब तक्रारदार पोलीस ठाण्यात जाता जाता माघारी फिरले होते तर या सौरभ आप्पा सोबत शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही असा पत्र पालघरच्या जिल्हाप्रमुखांनी काढून आज हेच जिल्हाप्रमुख नागरिकांच्या भावनेशी खेळत आहे का...?
बोईसर शहरप्रमुख हे कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाही. अशी चर्चा काही महिन्यापूर्वी झालेल्या सभेमध्ये शिवसैनिकांनी विधान परिषद आमदार तथा पालघर संपर्क प्रमुख रवींद्र पाठक यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. हे सत्य असून लोकांची फसवणूक करणारा शिंदे गटाचा थापा सौरव आप्पा याचा एका क्षणामध्ये फोन उचलून त्याची समस्या असेल त्या त्वरित सोडून शहरप्रमुख त्याला पाठीशी घालण्याचा सिंहाचा वाटा असणारे बोईसर विधानसभेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण व बोईसर शहर प्रमुख यांचे हा थापा मारणाऱ्या आप्पाकडे काही गुपित तर नाही ना ? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे.
आता झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिंदे गटाला चांगलेच अपयश आले असून जर का जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी गरीब गरजवंत लोकांची फसवणूक करून दमदाटी करणाऱ्या वादग्रस्त सौरभ अप्पाचा व इतर गोष्टीकडे लक्ष न देता जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष दिले असते तर आज शिंदे सरकारचे चांगले वर्चस्व असलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर सरपंच निवडून आले असते. जिल्हाप्रमुख फक्त पोस्टर व बॅनर वरच दिसत आहे कार्यकर्ता पर्यंत पोहोचत नाही अशी कुजबूज शिवसैनिकांमध्ये असल्यामुळे पुढील निवडणुकीत शिंदे गटाचा पुन्हा एकदा दारूण पराभव होणार असल्याचे नाराज शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत आहेत.
दरम्यान बोईसर, सरावली, खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीत विनापरवाना बॅनरबाजी करण्यात आलेली असून गोरगरिब जनतेकडून दामदुपटीने दंड वसूल करणाऱ्या या ग्रामपंचायतीकडून थापा मारणाऱ्या आप्पाला दिवाळीनिमित्त बोनस देण्यात आला आहे का ? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
◼️ सौरभ आप्पा हा शिवसेनेचा कार्यकर्ता नसून चुकीच्या गोष्टींना शिवसेना समर्थन देत नाही : वसंत चव्हाण - जिल्हाप्रमुख बोईसर विधानसभा
Comments
Post a Comment