बोईसर ग्रामपंचायतीतील भंडार वाड्यात पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन
बोईसर ग्रामपंचायतीतील भंडार वाड्यात पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन
बोईसर : गेल्या काही वर्षांमध्ये बोईसर ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने येथील जनतेला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने जनतेला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीत नव्याने निवडून आलेले सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच निलम संखे व सदस्य ह्यांनी अनेक विकास कामांचा सपाटा सुरू केलेला दिसत असुन ग्रामस्थाना भेडसवणार्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून लवकरच सुटका होणार आहे.
आज पाण्याचा तुटवडा बघता तसेच ग्रामस्थांची पाण्याची अडचण लक्षात घेता बोईसर ग्रामपंचायतीने भंडार वाडा बोईसर ह्या ठिकाणीं १५ वित्त आयोगातून तीन लक्ष् लिटर पाण्याची क्षमता असणारी पाण्याच्या टाकीची अंदाजित रक्कम ७९ लाख रु च्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचे भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन प्रसंगी बोलताना बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलम संखे ह्यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, ह्यांना आव्हान केले की सर्वांनी विकास कामा मध्ये सहकार्य केले असून पुढेही असेच सहकार्य करतील अशी अपेक्षा वेक्त केली.
हया भूमीपुजना प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तसेच सर्व पक्ष्याचे पदाधिकारी अशोक वडे, दिपक ठाकूर, प्रशांत संखे, चंद्रकांत जाधव, रंजना संखे, ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण, मुकेश पाटील, अलका गावड, राजेश करवीर, परशुराम दुमाडा, अजय ठाकूर, पंकज हाडल, रणजित खरात, कामिनी सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते .
Comments
Post a Comment