भारतीय संविधान दिवस व 26/11 दहशतवादी हल्ल्यात निष्पाप बळी गेलेले नागरिक व पोलीस जवानांना वाहली आदरांजली
भारतीय संविधान दिवस व 26/11 दहशतवादी हल्ल्यात निष्पाप बळी गेलेले नागरिक व पोलीस जवानांना वाहली आदरांजली
संविधान दिवस भारताच्या लोकशाहीचा उत्सव बोईसर, पालघर येथे उत्साहात झाला साजरा
बोईसर : २६ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बोईसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पालघर येथे 11 वाजताच्या दरम्यान भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संयोजक श्री नरेंद्र करणकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नेते, उपनेते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संविधानाची माहिती देणारा परिचय पट सादर करण्यात आला. संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती यावेळी देण्यात आली. यादरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना आदरांजली पालघर पोलीस स्टेशन येथे अर्पण करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नरेन्द्र करणकाळे यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना केली आणि त्यावर आपला मोलाचा वाटा उचलला. या संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. आपण सर्वांनी संविधानाचे पालन केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन संविधानाचा रक्षण करायला हवे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते नविन त्रिपाठी यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदे आहेत. संविधानाच्या आधारे आपला देश चालतो. आपल्या सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नासीर अंसारी, जब्बार सोलंकी, अमोल काळे, बिरबल कुशवाह, महेंद्र कांबळे आदी मान्यवरांनी परिश्रम केले.
Comments
Post a Comment