महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतर' विरोधी कायदा तातडीने लागू करण्यासाठी डहाणू येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनातून मागणी
महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतर' विरोधी कायदा तातडीने लागू करण्यासाठी डहाणू येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनातून मागणी
आंदोलनात हिंदूंच्या समस्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकडो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर
डहाणू - 26 डिसेंबर या दिवशी पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद' आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पाहता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा या मागण्यांसाठी डहाणू (प) येथील सागर लॉज नाक्याजवळ हिंदु-राष्ट्र जागृतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह शेकडो धर्मप्रेमी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’च्या समस्येने आता गंभीर रूप धारण केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई येथील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने तिचे 35 तुकडे करुन केलेली निघृण हत्या यांसह ‘लव्ह जिहाद’ विषयची अनेक गंभीर प्रकरणे आता उघड होत आहेत. या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली
सदर आंदोलनात राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. प्रवीण व्यास, पालघर जिला उपाध्यक्ष परेश भरवाड, पालघर जिल्हा महामंत्री कल्पना बारी आणि अशोक राजपूत, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बन महाराज पाटील, वनवासी कल्याण आश्रमाचे श्री. संतोष पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, समितीचे श्री. पंडित चव्हाण, समितीच्या रणराणिणी शाखेच्या सौ. अर्चना अंधारे यांनी आंदोलनात उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरुन घोषणाही देण्यात आल्या. तसेच शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
Comments
Post a Comment