पाम ग्रामपंचायत सरपंचपदी दर्शना दत्तात्रेय पिंपळे विराजमान
पाम ग्रामपंचायत सरपंचपदी दर्शना दत्तात्रेय पिंपळे विराजमान
पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी गावातील मतदारांनी भरघोस मत देऊन दर्शना दत्तात्रेय पिंपळे यांना निवडून दिले आहे.
पालघर तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत पाम गावाचाही समावेश असून यात थेट सरपंच पदासाठी 2 उमेदवार उभे होते तर ग्रा. प सदस्य पदासाठी 24 उमेदवारानी नामनिर्देशन केले होते.तर अर्चना (चेतना) चंद्रकांत संखे यांची बिनविरोध निवड झाली होती .यासाठी 18 डिसेबंरला झालेल्या मतदानात 1718 पैकी 1429 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका मोठया चूरशीची झाली यात 20 डिसेबंरला झालेल्या मत मोजणीत सरपंच पदाचे उमेदवार दर्शना दत्तात्रेय पिंपळे यांना 746 तर शिल्पा प्रभाकर पिंपळे यांना 672 मतदान झाले त्यामुळे दर्शना दत्तात्रेय पिंपळे यांनी निवडूकीत बाजी मारली आहे. तर पाम गावात एकूण चार वार्ड असून वार्ड क्र. 1 मधून रोहित पाटील, भारती राउत, वार्ड क्र. 2 मधून मनीष संखे, श्वेता संखे, वार्ड क्र 3 मधून कल्पेश संखे, पूजा वडे, वैभवी पिंपळे तर वार्ड क्र.4 मधून मनोज पिंपळे, मनीष जाधव, भारती जाधव हे निवडणुकीत सदस्य पदासाठी विजयी झाले आहे.
पाम गावात निवडणुका कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी लढविल्या नसल्या कारणाने येथे काही वार्डात पैनल बनवून निवडणुक लढविल्या गेल्या तेथे वार्ड क्र 1 व 4 मध्ये संपूर्ण पैनल निवडून आलेले आहेत.
Comments
Post a Comment