निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाम ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना पोलिसांकडून मार्गदर्शन

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाम ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना पोलिसांकडून मार्गदर्शन 

बोईसर: दिनांक 18 डिसेंबर ला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातपाटी पोलीसांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये थेट सरपंच आणि सदस्यपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. पाम ग्रामपंचायतीकडून थेट सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून 9 सदस्य पदासाठी 24 उमेदवार उभे आहेत.

यामुळे निवडणूक प्रचार काळात आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये. यासाठी सातपाटी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या उपस्थितीत उमेदवारांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत निवडणूक प्रचार काळात सर्व उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आचार संहितेचे पालन करणे, मतदारांना आकर्षीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रलोभने न दाखवणे, प्रचार करताना कोणत्याही व्यक्तीच्या अथवा धर्म आणि समाजाच्या भावना न दुखावणे, समाज माध्यमाद्वारे करण्यात येणारा प्रचार काळजीपूर्वक करणे, कोणत्याही अफवा पसरवु नये, बोगस मतदानाचा प्रयत्न करू नये, मतदार केंद्रातील उमेदवार प्रतिनिधीने  वारंवार आत बाहेर करू नये, मतदारांना घेऊन येण्याऱ्या गाड्याना 100 मीटर च्या बाहेरच उभे करावे, तसेच कोणत्याही प्रकारचे नाव किवां चिन्ह असलेली स्लिप मतदान केंद्रावर घेऊन जाऊ नये असेही सांगितले.

सदर बैठकीत सातपाटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले,पोलीस उपनिरीक्षक मयूरेश अंबाजी, पोलीस हवालदार ओमानंद माने तसेच पाम गावचे माजी सरपंच प्रभाकर पिंपळे, माजी उपसरपंच भूषण पिंपळे व सरपंच पदाचे उमेदवार दर्शना दत्तात्रय पिंपळे, शिल्पा प्रभाकर पिंपळे तसेच सदस्यपदाचे उमेदवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी