पोलीस अधीक्षक पालघर, बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक चषक 2022 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक पालघर, बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक चषक 2022 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक चषक 2022 मध्ये डहाणु संघाने विजेतेपद तर बोईसर संघाने उपविजेतेपद मिळवले आहे.
पालघर : दिनांक 03/12/2022 रोजी कोळगाव, पोलीस परेड मैदान येथे बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक चषक 2022 क्रिकेट सामन्याचे आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये डहाणु संघाने विजेतेपद तर बोईसर संघाने उपविजेतेपद मिळवले आहे.
पोलीस दलात असलेले दैनदिन काम व ताणतणाव यातुन विरंगळा मिळावा तसेच खेळाडूवृत्तीला वाव मिळावा म्हणुन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक चषक 2022 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिकेट सामन्यात पालघर पोलीस मुख्यालय संघ, दंगल नियंत्रण संघ व जलद कृती दल संघ असे एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता या क्रिकेट सामन्यामध्ये पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचेसह, अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.या पोलीस अधीक्षक चषक 2022 क्रिकेट सामन्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग या संघाने विजेतेपद मिळवले असून उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग या संघाने उपविजेतेपद मिळवले आहे.
सदर क्रिकेट सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. रविंद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण तथा पालकमंत्री पालघर जिल्हा, भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, पंकज कोरे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, भरत राजपूत नगराध्यक्ष, डहाणु नगरपालिका व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच या उपस्थित मान्यवराच्या हस्ते बक्षीस वितरण ही करण्यात आले.
मा. ना. रविंद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांनी सदर सामन्याचे कौतुक करत अशाचप्रकारे पालघर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट काम करुन पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात ऊंचवण्याकरीता शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment