पाम ग्रामपंचायत सरपंच पदी दर्शना दतात्रय पिंपळे तर उपसरपंच पदी मनोज रमेश पिंपळे
पाम ग्रामपंचायत सरपंच पदी दर्शना दतात्रय पिंपळे तर उपसरपंच पदी मनोज रमेश पिंपळे मनोज रमेश पिंपळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड पालघर : पालघर तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीत झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत पाम ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचपदी दर्शना दतात्रय पिंपळे तर उपसरपंचपदी मनोज रमेश पिंपळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज दिनांक 30/12/2022 रोजी उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पाम गावात उपसरपंच पदासाठी सर्व सदस्यानी पाठिंबा देत पाम ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी मनोज रमेश पिंपळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बापुराव नाळे यांनी सरपंच, उपसरपंच तसेच निवडून आलेले सर्व सदस्याना राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र तर्फे निवडून आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्रामसेविका अल्पना पाटील यांच्या कडून सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्याना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व सदस्यांनी देखील सरपंच व उपसरपंच यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. गावातील विकासाच्या दृष्ठिने जे काही कामे असतील ते सर्व लवकरात लवकर सर्वाना विश्वासात घेऊन पूर्ण क...