बोईसर: ग्रामपंचायत दाखला चोरी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती परंतु ग्रामविकास अधिकारी सक्षम अधिकारी नसल्याचे कारण सांगत पोलिस तक्रार घेत नाहीत
बईसर: ग्रामपंचायत दाखला चोरी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती परंतु ग्रामविकास अधिकारी सक्षम अधिकारी नसल्याचे कारण सांगत पोलिस तक्रार घेत नाहीत.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील शिंदे हाॅस्पिटल कडून डॉ. स्वप्निल शिंदे व डॉ. शितल मेहता यांनी आरोग्य अधिकारी पालघर यांच्याकडून परवाना मिळविण्यासाठी केलेल्या अर्जासोबत बोईसर ग्रामपंचायतीचा बोगस दाखला जोडला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सदर दाखला बोगस असल्याचा पत्र ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देऊन बोगस दाखला जोडणाऱ्या शिंदे हाॅस्पिटलवर उचित कारवाई करावी. असे स्पष्ट लिखित दिले आहे.
महावीर कन्ट्रक्शन कंपनी निर्मिणधीन शिंदे हाॅस्पिटल (निर्मळ निवास) कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना, फक्त आणि फक्त ग्रामपंचायत बोईसरचा चोरी केलेला बोगस दाखला वापरून दुय्यम निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व आरोग्य अधिकारी पालघर यांची फसवणूक करत शासनाचा लाखोंचा महसूल बूडवून अनेक खोटे नाटे दस्तावेज तयार करून आज तक्रार दाखल करणाऱ्या पत्रकारास सोलंकी कोर्टाची धमकी देत आहे.
ग्रामपंचायत दस्तावेज, डेडस्टॉक चोरी प्रकरणी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी सक्षम अधिकारी असताना दाखला चोरी प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठेवून आणखी किती दिवस चोराला मोकाट ठेवणार आहेत. महावीर कन्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करून आणखी किती दाखले चोरले आहे याचा देखील शोध घेणं आवश्यक आहे.
◾ कमलेश संखे-ग्रा वि अधिकारी बोईसर ग्रा.पं: पोलिसांना तक्रार दाखल केली होती परंतु ग्रामविकास अधिकारी सक्षम नसल्याचे कारण पुढे करत पोलिस तक्रार घेण्यास तयार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आदेश येताच कारवाई केली जाईल.
◾ सिध्दाराम सालीमठ-मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प पालघर: ग्रामपंचायतीचा सक्षम अधिकारी ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी असतो. ग्रामपंचायतीच्या चोरी प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. माझ्याकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली असून लवकरच त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.
क्राईम रिपोर्ट: स्वप्निल पिंपळे
Comments
Post a Comment