Posts

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीच्या प्रकरणात :अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी !*

Image
 *पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीच्या प्रकरणात :अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी !* *हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या विरोधाला यश*          पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी कारभार करत भजन, कीर्तन आणि नामजप करण्यास बंदी घालणार्‍या सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची महाराष्ट्र शासनाने उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत केले . गजानन गुरव यांनी कोणताही लेखी आदेश न काढता, बैठक न घेता, कोणालाही विश्वासात न घेता केवळ तोंडी आदेशाद्वारे अचानक श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तनावर बंदी घालण्यात आली होती. याचा हिंदु जनजागृती समिती आणि समस्त वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध केला होता. श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन नाही करायचे तर कुठे करायचे ? असा प्रश्न करत देवस्थान समितीमध्ये विठ्ठलाचे भक्त अधिकारी-कर्मचारी असावेत आणि गजानन गुरव यांना मंदिर समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली होती. ही मागणी शासनाने मान्य केली आणि आदेश काढून गुरव यांची या पदावरून हकालपट्टी केली. त...

*‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर हिंदु जनजागृती समितीने केले स्वागत !*

Image
  *‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर हिंदु जनजागृती समितीने केले स्वागत !* *नवरात्रीत ‘पीएफआय’सह नऊ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !* -  हिंदु जनजागृती समितीचे केंद्र सरकारकडे मागणी               केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (UAPA) बंदी घातली, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. ‘पी.एफ्.आय.’चा अनेक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी कारवायांमध्ये, तसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे. हिंदु जनजागृती समितीने गेली काही वर्षे आंदोलने, निवेदने, सोशल मिडीया कॅम्पेन आदींच्या माध्यमांतून ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. देशात नवरात्री चालू आहे आणि त्यातच ‘पी.एफ्.आय.’सह नऊ राक्षसी जिहादी संघटनांना संपवण्यात आले आहे. *आता ‘पी.एफ्.आय.’ची राजकीय संघटना असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी आणून ‘दसरा’ साजरा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.      काही...

प्रेम प्रकरणातुन गोळीबार झालेल्या मुलीचा मृत्यु तर प्रियकराने केली आत्महत्या

Image
  प्रेम प्रकरणातुन गोळीबार झालेल्या मुलीचा मृत्यु तर प्रियकराने केली आत्महत्या  पालघर :पालघर जिल्ह्यातील बोइसर येथे शासकीय टिमा हॉस्पिटल जवळ एका तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यु झाला असून गोळीबार करण्याऱ्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दिनांक 28/09/2022 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास बोईसर येथील टिमा हॉस्पिटल जवळ प्रेमप्रकरणातुन कृष्णा सत्यदेव यादव रा. कोलवडे या तरुणाने नेहा दिनेश महतो रा. सरावली ( वय 21वर्ष ) या तरुणीची गावठी पिस्टलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली  त्यानंतर गोळी मारुन पळून जात असताना डी डेकोर कंपनी समोर आरोपीने सीआयएसएफ च्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला यामध्ये आरोपी कृष्णा यादव हा जख्मी झाला होता याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेत टिमा हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा ही मृत्यु झाला आहे.  पोलीस सदर घटनेचा पुढील तपास करत आहे.

महामार्गावरील अपघात रोखने करीता पोलीस अधीक्षक यांनी घेतली नेशनल हाईवे अथॉरिटी यांची बैठक

Image
महामार्गावरील अपघात रोखने करीता पोलीस अधीक्षक यांनी घेतली नेशनल हाईवे अथॉरिटी यांची बैठक  पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेत बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी होत असलेले अपघात रोखण्यासाठी दिनांक 26/09/2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), महामार्ग देखरेख ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची एकत्रीतपणे बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये महामार्गावरील असलेल्या अपघात प्रवण (ब्लैक स्पॉट) क्षेत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात महामार्गावर पालघर जिल्ह्यात एकूण 15 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. या अपघात प्रवण क्षेत्र याठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी सूचना फलक लावणे, अनधिकृत रोड कटिंग बंद करणे, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर स्ट्रीपस लावणे. रस्त्याच्या बाजूला वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येण्यासाठी कैट आईज, डेलीनेटर्स ब्लीकर्स, महामार्गावरील पडलेले खड्डे भरणे अशा उपाय योजना करण्याचे सूचविले आहे. तसेच ही सर्व नमूद उपाययोजना या तीन आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे राष्ट्रीय मह...

बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्याने महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन

Image
  बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्याने महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन भिवंडी : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या (BNMC) सहाय्यक महापालिका आयुक्तांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, BNMC आयुक्त विजयकुमार महासाळ यांनी 23 सप्टेंबरच्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांना वारंवार बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, परंतु ते तसे करण्यात अपयशी ठरले. अशा किमान पाच प्रकरणांचा दाखला देत आदेशात म्हटले आहे की, वारंवार सूचना देऊनही अधिकारी काम करत नसल्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.

*‘आंदोलनात्मक दहशतवादा’च्या माध्यमांतून राष्ट्राला अधिक हानी पोहोचवणार्‍या पी.एफ्.आय. कारवाई आवश्यक !* - ब्रिगेडिअर हेमंत महाजन

Image
 * ‘आंदोलनात्मक दहशतवादा’च्या माध्यमांतून राष्ट्राला अधिक हानी पोहोचवणार्‍या पी.एफ्.आय. कारवाई आवश्यक !* - ब्रिगेडिअर हेमंत महाजन नागरिकांनी निवडून दिलेल्या सरकारने बनवलेल्या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध करून हिंसाचार केला जात आहे. वर्ष 2014 नंतर दहशतवादाचे स्वरुप बदलत चालले आहे. सध्या ‘एजीटेशनल टेररीझम’च्या (आंदोलनात्मक दहशतवाद) माध्यमातून देशाला धोका निर्माण करण्याचे कार्य ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून (पी.एफ्.आय.) चालू आहे. दहशतवादी हल्ल्यांपेक्षा दंगल घडवणे, लोकांना उग्रवादी बनवणे यांमुळे अधिक हानी होत आहे, हे या लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे पी.एफ्.आय.ची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे, *असे प्रतिपादन सैन्य दलातील सेवानिवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले.* ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित *‘पी.एफ्.आय.वर बंदी का आणावी ?’* या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.  *ब्रिगेडिअर हेमंत महाजन पुढे म्हणाले की,* उग्रवादी संघटना किंवा दहशतवादी संघटना यांना काम करण्यासाठी पैसे लागतात. पी.एफ्.आय.ला इस्लामी राष्ट्रांतून फंडिंग झाले आहे. ...

पालघर जिल्ह्यात एकदिवशीय पोलीस पाटील मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न

Image
  पालघर जिल्ह्यात एकदिवशीय पोलीस पाटील मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न  महाराष्ट्रात प्रथमच पालघर जिल्ह्यात पालघर पोलीसांकडून पोलीस पाटलांसाठी नविन गणवेश  पालघर :पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यात प्रथमच सुरु केलेल्या जनसंवाद अभियान 2022 अंतर्गत गाव आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषगाने 23/09/2022 रोजी  जिल्हा नियोजन कार्यालय पालघर येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण 244 पोलीस पाटील हजर होते व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकडमी नाशिक येथील विधि निदेशक संजय पाटील यांना आंमत्रित करण्यात आले होते. पोलीस पाटील हा गावपातळीवरचा महत्वाचा घटक आहे. प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. तसेच गावात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता कशी राहिल तसेच महिलाच्या तक्रारी, गावात झालेले अ नैसर्गीक मृत्यु, अपघात, संशयस्पद मृत्यु, अवैध धंदे, गुन्हेगारी , दरोडे...