पालघर पोलिसांची धडक कारवाई : बोईसरमधून १२ किलो गांजासह झारखंडचा युवक अटकेत

पालघर पोलिसांची धडक कारवाई : बोईसरमधून १२ किलो गांजासह झारखंडचा युवक अटकेत

पालघर – जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर परिसरात मोठी कारवाई करत १२ किलोहून अधिक गांजासह एक आरोपी अटक केला आहे.

दि. ३० जून २०२५ रोजी पालघर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बोईसर येथील धोडीपुजा, मयुर धोडी चाळीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आले. माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आरोपी पंजु समरा कुजर (वय ३५, मूळ रा. मांडर, जि. रांची, झारखंड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ किलो ७८० ग्रॅम वजनाचा, १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.


या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(II) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र गावडे करत आहेत.


सदरची कारवाई यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे परि. पोलीस उप अधीक्षक, बोईसर डॉ. भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक. प्रदिप पाटील, सपोनि अनिल व्हटकर, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/विजय ठाकूर, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोअमं/प्रशांत निकम सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पार पाडलेली आहे.


पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला या कारवाईमुळे बळ मिळाले असून पोलिसांचे पथक यापुढेही अशा कारवाया सुरु ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू