बोईसरमध्ये मोरया बिल्डरकडून खोटे डिमांड लेटर सादर करून GIC फायनान्सची लाखो रुपयांची फसवणूक

बोईसरमध्ये मोरया बिल्डरकडून खोटे डिमांड लेटर सादर करून GIC फायनान्सची लाखो रुपयांची फसवणूक

बोईसर – बोईसर येथील जी.आय.सी. हौसिंग फायनान्स लिमिटेड या वित्त संस्थेची १३.३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोरया बिल्डर्सचे भागीदार सतिष जे. यादव आणि जीआयसी फायनान्सचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक किरण आल्हाद लाड यांच्याविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीआयसी फायनान्सचे वसुली अधिकारी संतोष जानबा खवरे (वय ४२) यांनी तक्रार दिली असून, हा प्रकार २०१४ ते २०१७ या कालावधीत घडल्याचे सांगितले झाले. सदर कालावधीत मोरया बिल्डरचे भागीदार सतिष यादव यांनी केवळ ६०-६५% बांधकाम पूर्ण असलेल्या सदनिकेचे ९०% बांधकाम पूर्ण असल्याचे खोटे डिमांड लेटर तयार केले. हे डिमांड लेटर खरे असल्याचे भासवून ते खरेदीदार मनोज रमाकांत मोरे, चारुशिला मोरे आणि एजंट पिंकल राठोड यांच्या मार्फत GIC फायनान्सच्या बोईसर शाखेत सादर करण्यात आले.


तत्कालीन शाखा व्यवस्थापक किरण लाड यांनी कोणतीही खात्री न करता सदर डिमांड लेटरच्या आधारे १३,३३,६२२ रुपयांची रक्कम मोरया बिल्डरच्या खात्यावर वर्ग केली. प्रत्यक्षात केवळ १,९०,००० रुपयांचे काम पूर्ण झाले असताना, उर्वरित ३,४३,६२२ रुपयांची अतिरिक्त रक्कम घेतल्याने कंपनीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २५१/२०२५ प्रमाणे भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), १९८ (खोटे पुरावे सादर करणे), व ३४ (सहभाग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू