पालघरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन

पालघरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन

पालघर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पालघर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता शहरातील जामा मशिदेच्या बाहेर, नमाज पठणानंतर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हा निषेध नोंदवला.

देशभरात या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असताना, पालघरमधील मुस्लिम समाजानेही या घटनेविरोधात एकजूट दाखवत निषेध आंदोलन केले. यावेळी उपस्थितांनी हातावर काळ्या फिती बांधून हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली व शोक व्यक्त केला.


निषेध आंदोलनादरम्यान 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'दहशतवादाचा नाश होवो', 'पाकिस्तानवर कारवाई करा' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फाडून जाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणीही केली.


या आंदोलनात मुस्लिम समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, युवक व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती. त्यांनी स्पष्टपणे दहशतवादाचा निषेध करत शांतता व एकतेचा संदेश दिला.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू