बोईसरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर ग्रामपंचायतीची कारवाई

बोईसरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर ग्रामपंचायतीची कारवाई

बोईसर : यादव नगर आणि धनानी नगर परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांवर बोईसर ग्रामपंचायतीने आज सकाळपासून तोडक कारवाई सुरू केली.

ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार, या गाळ्यांसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही बांधकामे बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्यात आली.


सरपंच दिलीप धोडी यांनी सांगितले की, “अनधिकृत बांधकामांविरोधात ग्रामपंचायत कडक भूमिका घेत आहे. येत्या काळात काटकर पाडा, दांडी पाडा आणि धनानी नगरमधील इतर बेकायदेशीर चाळी, घरे आणि गाळ्यांवरही कारवाई होणार आहे.”


या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, ग्रामपंचायतीच्या भूमिकेचं काही नागरिकांनी स्वागत केलं आहे.



Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक