"आईच झाली खुनी, नवजात बालिकेची नाकदाबून हत्या"

"आईच झाली खुनी, नवजात बालिकेची नाकदाबून हत्या"

पालघर - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोणीपाडा गावात चौथ्यांदा मुलगी झाल्याने नाराज झालेल्या एका महिलेने आपल्या दोन दिवसांच्या नवजात चिमुरडीची गळा घोटून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोलकत्याहून माहेरी आलेल्या पुनम शहा (वय ३०) हिने ही संतापजनक कृती केली असून, डहाणू पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

पुनम शहा ही आपल्या तीन मुलींनंतर पुन्हा चौथ्या अपत्याच्या जन्मासाठी कोलकत्याहून माहेरी, डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथे आली होती. तिच्या चौथ्याही अपत्याने मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे ती प्रचंड नाराज होती. या रागातून तिने आपल्या अवघ्या दोन दिवसांच्या नवजात मुलीचे नाक आणि तोंड दाबून श्वास रोखून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.


हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात सदर महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी तिला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


या हृदयद्रावक घटनेमुळे डहाणू तालुक्यात तसेच पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. "बेटी बचाओ, बेटी पढाओ" सारख्या मोहिमा राबवूनही अजूनही समाजात मुलगा-मुलगी भेदाभेदाची मानसिकता ठसठशीतपणे दिसून येत आहे, हे या प्रकारावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका