किसान मोल्डिंग कंपनीत चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल"
"किसान मोल्डिंग कंपनीत चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल"
बोईसर : बोईसर पूर्वे महागाव येथील औद्योगिक परिसरातील किसान मोल्डींग कंपनीत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता कुकडे महागाव येथील कंपनीत हा प्रकार घडला.
रमेशकुमार जशराज शर्मा (वय ४२ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मंगेश भोईर (पूर्ण नाव अद्याप अज्ञात) व त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात साथीदाराने संगनमत करून कंपनीतील अंदाजे २६ किलो वजनाचे ब्रास इन्सर्ट चोरण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी बोईसर पोलिसांनी १८१/२०२५ या गुन्हा नोंदवला असून, भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५, ६२ व ३(५) नुसार कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
Comments
Post a Comment