टपऱ्यांवर गुटख्याचे साम्राज्य; बोईसर बनतोय गुटखा हब"

टपऱ्यांवर गुटख्याचे साम्राज्य; बोईसर बनतोय गुटखा हब"

बोईसर : राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातलेली असतानाही बोईसरमध्ये खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

बोईसरमधील जारा किराणा अँड जनरल स्टोअरमध्ये सर्रास गुटख्याची विक्री सुरू असून, गुजरातमधील सेलवास, बिलाड आणि संजाण येथून मोठ्या प्रमाणावर गुटखा तयार करून महाराष्ट्रात त्याची तस्करी केली जाते. पालघर पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आली असली तरी गुटख्याची वाहतूक बोईसरमध्ये सहजपणे होते.


शिगाव रोडवरील ‘हाफिजीचा अमन’ म्हणून ओळखला जाणारा गुटखा माफिया बोईसरमधील बेकायदेशीर टपऱ्यांवर गुटख्याचा पुरवठा करत आहे. हार्मोनी रेसिडेन्सी, रेल्वे स्थानक, डिजयनगर आणि बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यालगत गुटख्याच्या टपऱ्या खुलेआम उभ्या राहिल्या असून, त्यातून 'गोवा', 'विमल', 'रजनीगंधा' यांसारख्या गुटख्याचे पाकिटे खुलेआम विकले जात आहेत. ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवूनही बोईसर ग्रामपंचायती कडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे गुटख्याचा अवैध व्यापार दिवसेंदिवस बळावत चालला आहे, ज्यामुळे युवकांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे.


Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड