"वाडा तालुक्यात २५ वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल"

"वाडा तालुक्यात २५ वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल"

वाडा : सापने व गो-हे गावातील तब्बल २५ वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन परस्पर विकल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल मुरली चावला (वय ५६, रा. वसई पश्चिम) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मयत वडिलांनी मुरली मदनमोहन चावला यांनी सन १९९५ मध्ये सापने बुद्रुक येथील १६५ गुंठे जमीन पद्माकर पोटु भोईर (रा. सुपोंडे) याच्याकडून विकत घेतली होती. त्याचप्रमाणे, गो-हे गावातील सुमारे ८७.७ गुंठे जमीन शरयु आंबो गायकवाड (रा. सापने बुद्रुक) यांच्याकडून खरेदी केली होती. यासंबंधी अधिकृत दस्तऐवज व खरेदीखतही तयार करण्यात आले होते.


मात्र, सदर जमिनींचे ७/१२ उतारे फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या संधीचा गैरफायदा घेत आरोपींनी परस्पर पद्धतीने ही जमीन इतर त्रयस्थ व्यक्तीला विकून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आले आहे.


या प्रकारामुळे चावला कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून, संबंधित आरोपींविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी काही लोक सामील आहेत का, याची चौकशी सुरु आहे.



Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड