पालघर बालकल्याण समितीचे आवाहन: बालकांच्या पालकांचा शोध सुरू, त्वरित संपर्क साधा

पालघर बालकल्याण समितीचे आवाहन: बालकांच्या पालकांचा शोध सुरू, त्वरित संपर्क साधा

पालघर : जिल्ह्यातील विविध बालकल्याण संस्थांमध्ये दाखल असलेल्या काही बालकांच्या पालकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे संबंधित बालकांचे आई-वडील, पालक किंवा नातेवाईकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन बालकल्याण समिती, पालघर यांनी केले आहे.

१. कु. पायल विनोद सिकंदर (वय १३ वर्षे)

लक्षणे: सावळा रंग, गोलसर चेहरा, उंची 150 सेमी, कपाळावर जखमेचा व्रण

दाखल तारीख: २४ मे २०२१

संस्था: रेस्क्यू फाउंडेशन, बोईसर

संपर्क:

सौ. शारदा खुलात (अधीक्षक) – मो. 9960945567

श्री. विनोद राठोड (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) – मो. 9890853282



२. कु. अर्जुन बबलु पाटील (वय ८ वर्षे)

लक्षणे: काळसर सावळा रंग, गोलसर चेहरा, उंची 118 सेमी, कपाळावर जखमेचा व्रण

दाखल तारीख: ८ जुलै २०२१

संस्था: करुणा वेल्फेअर, वसई

संपर्क:

रुबी जोसेफ (अधीक्षक) – मो. 8169334613

श्री. विनोद राठोड (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) – मो. 9890853282



३. कु. इरफान समशेर खान (वय ८ वर्षे ७ महिने)

लक्षणे: काळसर सावळा रंग, लांबट चेहरा, उंची 135 सेमी, डाव्या खांद्यावर तीळ

दाखल तारीख: ३० जुलै २०२२

संस्था: करुणा वेल्फेअर, वसई

संपर्क:

रुबी जोसेफ (अधीक्षक) – मो. 8169334613

श्री. विनोद राठोड (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) – मो. 9890853282



४. कु. काजल प्रदीप कांबळे (वय १३ वर्षे ३ महिने)

लक्षणे: सावळा रंग, गोलसर चेहरा, उंची 154 सेमी

दाखल तारीख: ३ डिसेंबर २०२४

संस्था: गुड शेफर्ड होम, विरार

संपर्क:

कमला लाकरा (अधीक्षक) – मो. 9198032377

श्री. विनोद राठोड (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) – मो. 9890853282


३० दिवसांत संपर्क साधावा अन्यथा दावा अमान्य

या बालकांचे पालक, नातेवाईक किंवा हक्क सांगणाऱ्या व्यक्तींनी त्वरित खालील ठिकाणी संपर्क साधावा. अन्यथा बालकल्याण समिती त्यांच्या ताब्याचा दावा ग्राह्य धरला जाणार नाही.


संपर्क पत्ता:

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, कक्ष क्र. १०८, पहिला मजला, प्रशासकीय इमारत-अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पालघर - ४०१४०४


बालकल्याण समिती, पालघर, रूम नं. २०१, दुसरा मजला, क्लासिक कॉर्नर बिल्डिंग, कचेरी नवली फाटक रोड, पालघर


- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड