आदिवासी विकास महामंडळाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना 46 कोटींचे भुगतान

आदिवासी विकास महामंडळाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना 46 कोटींचे भुगतान

पालघर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजना ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मंजूर ९ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली असून, आतापर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून ९५,९४३.३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

महामंडळाने ६९४ शेतकऱ्यांना आतापर्यंत ३.९४ कोटी रुपयांचे भुगतान केले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे धान चुकारे अदा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. महामंडळाच्या जलद कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


शेतकऱ्यांनी त्वरित त्रुटी दूर करण्याचे आवाहन


नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना काही त्रुटी आढळून आल्या आहेत, जसे की –


▪️7/12 उतारावर खरीप हंगाम 2024-25 चा पीक पेरा नसणे


▪️बँक खात्याचा क्रमांक व एनईएमएल पोर्टलवरील खात्यात तफावत असणे


▪️नोंदणीच्या वेळी व लॉट एन्ट्री करतानाचा शेतकरी फोटो जुळत नसणे


▪️केवायसी फॉर्म बँकेकडून पडताळलेले नसणे


महामंडळाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे भुगतान प्रलंबित आहे, त्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर mahatdc.in यादी तपासावी आणि आवश्यक त्रुटी त्वरित दुरुस्त कराव्यात. असे केल्यास त्यांचे चुकारे लवकर अदा करता येतील.


महामंडळाच्या प्रयत्नांमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असून, लवकरच उर्वरित शेतकऱ्यांचेही पेमेंट पूर्ण होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू