बोईसरमध्ये कारचालकाने तरुणाला जोरदार धडक देत नेले फरफटत; कारचालक फरार

बोईसरमध्ये कारचालकाने तरुणाला जोरदार धडक देत नेले फरफटत; कारचालक फरार


बोईसर : बोईसर एमआयडीसीमधील मधुर नाका ते मुकुट नाका रोडवरील पी डी मोटर्स समोर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता एक भीषण अपघात घडला. समृद्ध फार्मा कंपनीत काम करणारे मच्छिंद्र बागल हे सकाळी पायी कंपनीत जात असताना, मागून येणाऱ्या सिल्वर कलरच्या व्हॅगनार कारने त्यांना जोरदार धडक दिली.

धडकेनंतर बागल रस्त्यावर पडले आणि कार चालकाने त्यांना फरफडत नेत, कारच्या चाकाखाली घेतले. या अपघातात बागल गंभीरपणे जखमी झाले असून त्यांना त्वरित संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू आहेत.

तथापि, अपघात घडल्यानंतर कारचालकाने जखमी कामगाराला दवाखान्यात न नेत, अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला.


बोईसर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू