तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मा कंपनीवर मोठी कारवाई : नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मा कंपनीवर मोठी कारवाई : नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश


बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील एव्हीओ फार्मासिटीकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) तसेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. आफ्रिकन देशांमध्ये निर्यात होणाऱ्या वेदनाशामक औषधांचा वापर नशेसाठी होऊ लागल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कंपनीच्या प्लॉट क्रमांक सी-13 वर औषधांच्या आडून अंमली पदार्थांचा काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. ट्रामाडोल, टॅपेंटाडोल आणि केटोरोलॅक ट्रॉमिथामाइन (ओपीओआयड्स) यांसारखी औषधे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती, ज्यांचा वापर नशेखोर टोळ्यांकडून ड्रग्सप्रमाणे केला जात होता.


एफडीएने या प्रकरणी धडक कारवाई करत कंपनीच्या सर्व व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. औषधांच्या ट्रॅकिंग आणि रेग्युलेशनमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्याने संपूर्ण तारापूर औद्योगिक वसाहतीची चौकशी करण्याची मागणी स्थानिक पातळीवर उचलली जात आहे.


केंद्रीय औषध प्रशासनाने कंपनीच्या औषध साठ्यावर तातडीने जप्ती आणली आहे, तसेच उत्पादन प्रक्रियेचे परीक्षण सुरू आहे. महाराष्ट्र एफडीए आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी संयुक्त तपास सुरू केला आहे.

फार्मा कंपन्यांच्या संशयास्पद व्यवहारांवर प्रकाश पडल्यामुळे स्थानिक स्तरावर मोठे प्रश्न विचारले जात आहेत. "औषधांच्या नावाखाली नशेचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घालणारे कोण?" असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका