वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ८ तासांत अपहृत मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक

वाडा पोलिसांची मोठी कारवाई: ८ तासांत अपहृत मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक


पालघर : वाडा पोलिसांनी ८ वर्षाच्या अपहृत मुलीचा ८ तासांच्या आत शोध घेत आरोपीला ताब्यात घेतले. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय गांधी नगर, वाडा येथील महिला फिर्यादीने पोलिसांत तक्रार केली की, त्यांची मुलगी घरासमोर खेळत असताना एक संशयित व्यक्ती तिला फसवून पळवून नेला. या गंभीर घटनेवर तात्काळ कार्यवाही करत वाडा पोलिसांनी अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जनसंवाद अभियानाचा वापर करत व्हॉट्सअप ग्रुपवर मुलीचा फोटो आणि संशयित आरोपीचे वर्णन प्रसारित केले. एका लहान मुलीने आरोपीचे नाव "डेव्हिड" असे सांगितले, आणि त्यावरून पोलिसांनी आरोपीच्या ठावठिकाणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन ऐनशेत गावात जात असताना दिसला.


पोलिसांनी तत्काळ ऐनशेत गावातील नागरिकांची मदत घेत, वाडा आणि देसई परिसरात शोध घेत असताना, पहाटे ५ वाजेच्या सुमारास आरोपी शाखीनगर परिसरात लपून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.


वाडा पोलिसांनी ८ तासांत ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. वाडा पोलिस ठाण्यात गु. रजि. नं. ९०/२०२५, भा.न्या.सं. २०२३ कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.


ही कारवाई बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलिस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उप विभागीय पोलिस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक,  वाडा पोलीस ठाणे आणि त्यांच्या तपास पथकाने अत्यंत यशस्वीरित्या केली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू