घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, दोन आरोपी अटक

घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, दोन आरोपी अटक


पालघर : पालघर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी आणि वाहन चोरीसह इतर गुन्ह्यांच्या तपासात मोठं यश मिळवलं आहे. विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी व वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१. मनोर पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरी दि. ११/०२/२०२५ ते १२/०२/२०२५ दरम्यान मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी श्री. राजु गणपत पाडेकर यांच्या घरासमोर उभी केलेली ८०,०००/- रुपयांची वेंगनर कार चोरट्यांनी चोरून नेली. यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


२. तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. ११/०२/२०२५ ते १२/०२/२०२५ दरम्यान तलासरी पाडवीपाडा येथील शोरूममधून ३,००,०००/- रुपयांची एक टाटा पंच कार चोरीला गेली. यावर देखील तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


३. बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. १५/०२/२०२५ रोजी बोईसर येथील एका मेडिकल दुकानातून ३०,०००/- रुपयांची रोख रक्कम चोरली गेली. यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


४. सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी दि. १३/०२/२०२५ रोजी पाम गाव येथील श्री. हितेश गजानन राऊत यांच्या दुकानातून ६८,५१०/- रुपयांची वस्तू चोरीला गेली. यावर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अटक व जप्ती: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींमध्ये १) सुरेश असलाजी चौधरी (वय ३० वर्षे, रा. भूशी, पाली, राजस्थान) आणि २) राजु ऊर्फ मो. रेहान शेख (वय ४७ वर्षे, रा. गोवंडी, मुंबई) यांचा समावेश आहे. सुरेश चौधरीला दि. १७/०२/२०२५ रोजी खैरापाडा बोईसर येथे अटक करण्यात आली, तर राजु शेखला दि. २०/०२/२०२५ रोजी पुणे येथून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एक व्हॅगनर कार, एक टाटा पंच कार, विविध वस्तू आणि चोरीस घेतलेली साहित्य जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठा ठपका बसला आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू