तलासरीत निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीत फेकण्याची धक्कादायक घटना

तलासरीत निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीत फेकण्याची धक्कादायक घटना


तलासरी : आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनी निर्दयीपणे नवजात अर्भकाला नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उधवा-तलासरी राज्यमार्गावरील उधवा-नवापाडा वाणीपाडा येथे नदीपात्रात एक नवजात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. पुलाखालील गवतात अडकलेले अर्भक पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासानुसार, हे अर्भक एक ते दोन दिवसांचे असून पाण्याच्या प्रवाहात वाहून आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


या अमानुष कृत्यामुळे उधवा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "निर्दयीपणे नवजात बाळ नदीत फेकणाऱ्या नराधमांना तात्काळ शोधून कठोर शिक्षा व्हावी," अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रहिवाशांची चौकशी करून अर्भकाच्या मातापित्याचा शोध घेतला जात आहे.

हे कृत्य समाजाच्या संवेदनशीलतेला तडा देणारे असून, नको असलेल्या अपत्याचा बळी देण्यासाठीच हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. "या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, लवकरच गुन्हेगारांना शोधून कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.


आईने आपल्या पोटच्या गोळ्याला असे निर्दयीपणे नदीत का फेकले, हा प्रश्न सर्वांच्याच मनाला वेदना देणारा आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून, दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू