अवैध गौणखनिज वाहतूकीवर बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांची धडक कारवाई; वाहन जप्त
अवैध गौणखनिज वाहतूकीवर बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांची धडक कारवाई; वाहन जप्त
बोईसर : बोईसर पूर्व भागातील दगड खाणीतून गौणखनिजांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अशा अवैध वाहतुकीला विरोध करत असताना काही समाज कंटकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. तथापि, बोईसर मंडळ अधिकारी विजय गुडंकर यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
गौणखनिजांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर विजय गुडंकर यांचे पथक गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील पांजरे पाडा या ठिकाणीं होत असलेल्या गौणखनिज वाहतूक करणारे चार ट्रक, एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पकडण्यात यशस्वी झाले. संबंधित वाहने बोईसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, त्यावर दंडाची रक्कम भरली जात नाही तोपर्यंत ते ताब्यात राहणार आहेत.
विजय गुडंकर यांनी सांगितले की, "कुणाच्याही दबावाला बळी न पडता, अवैध गौणखनिज वाहतूकीविरोधात कडक कारवाई सुरू ठेवणार आहे आणि लवकरच यावर नियंत्रण मिळवले जाईल."
या धडक कारवाईमुळे बोईसर परिसरात अवैध गौणखनिज वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment