"कार बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला ढकलताना अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू"तर दुसरा जखमी
"कार बंद पडल्याने रस्त्याच्या बाजूला ढकलताना अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू"तर दुसरा जखमी
पालघर – हॉटेल फर्नजवळील ढेकाळे गावाच्या हद्दीत १५ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या भीषण अपघातात रीतेश रमेश सिंह (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रात्री अंदाजे ११:३० वाजता घडला.
रीतेश सिंह आणि त्यांचा मित्र निखिल गणेश वडे हे नालासोपारा येथून बोईसरकडे जात होते. त्यांनी निखिलच्या मित्राची कार (MH.06AW.0799) वापरली होती. ढेकाळे गावाजवळ अचानक कार बंद पडली, ज्यामुळे दोघे मिळून कार रस्त्याच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातात रीतेश सिंह यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने मनोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. निखिल वडे यांच्यावर काशिमीरा येथील वोखार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात घडवून अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
रीतेश सिंह यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त रस्त्यावर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment