पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी घोटाळा उघडकीस: करोडो रुपयांचा अपहार

पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी घोटाळा उघडकीस: करोडो रुपयांचा अपहार


पालघर : पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतीत घरपट्टी वसुलीच्या नावावर करोडो रुपयांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. माजी सरपंच अशोक वडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, त्यात गंभीर आरोप केले आहेत.

पाम ग्रामपंचायत हद्दीत २०० पेक्षा जास्त छोटे मोठे कारखाने असून, या कारखान्यांचे बांधकाम औद्योगिक विभागाच्या नियमांनुसार होत आहे. प्रत्येक बांधकामासाठी उपअभियंते यांची संमती घेणं अनिवार्य असते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, ग्रामपंचायतीकडून त्या बांधकामाचे मोजमाप आणि त्यानुसार घरपट्टी वसुली केली जाते.


परंतु, माजी सरपंच अशोक वडे यांच्या आरोपानुसार, पाम ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारखाना मालकांसोबत संगनमत करून मोजमापाच्या निम्मा पेक्षा कमी मोजमाप दर्शवून व अत्यल्प रक्कम वसूल केली आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतीला करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषत: औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र - एन ७९ मे रॉयल फार्मा या कारखान्याचा एकंदरीत मोजमाप १६७३१ चौ फुट असतानाही, ग्रामपंचायतीने फक्त ३००० चौ फुट मोजमाप घेतल्याचे उघड झाले आहे.


या घोटाळ्यात लुपिन, सॅरेक्स, सिरॉन सारख्या मोठ्या कारखान्यांचेही नाव समोर येत असून, काही कर्मचार्यांच्या देखील संलिप्ततेचे संकेत मिळाले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर, मुख्यकार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून काय कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला