बोईसर शहरातील भीम नगर येथे महादेव स्टील दुकानाला लागली भीषण आग
बोईसर शहरातील भीम नगर येथे महादेव स्टील दुकानाला लागली भीषण आग
बोईसर : सोमवारी सकाळी सुमारे ४:३० वाजता बोईसर शहरातील भीम नगरमध्ये महादेव स्टील दुकानाला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. बादली आणि पाईपच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला, मात्र आगीच्या ज्वालांचा वेग जास्त असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले.
आग वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ 112 आपातकालीन सेवेवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्वरित अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्तीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे परिसरातील इतर दुकांन्यांचे बचाव झाले.
या आगीत महादेव स्टील दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची माहिती नाही. पोलिस व अग्निशमन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळ सुरक्षित केले आहे, आणि परिस्थिती आता सामान्य आहे.
Comments
Post a Comment