बोईसरमध्ये ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’

बोईसरमध्ये ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’


बोईसर – सामाजिक सेवा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या 'विश्वमांगल्य सभा'च्या वतीने बोईसरमध्ये आयोजित भव्य नाट्यप्रयोग ‘देवी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यगाथा’ अत्यंत उत्साहात पार पडला. या नाट्यप्रयोगाला एम3एम फाउंडेशनचे सहकार्य होते. बोईसर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला.


कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली. या नाट्यप्रयोगात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्याग, न्यायप्रियतेचे आणि समाज सुधारासाठी केलेल्या कार्याचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले. नाटकातील प्रसंग, संवाद आणि अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाला स्वामी नारायणदास सरस्वती, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रशांत हलदरकर, तालिनी हावरे यांसारख्या मान्यवरांचा उपस्थिती लाभली. ‘भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड’चे चेअरमन पुरुषोत्तम भगेरीया यांनी या नाट्य प्रयोगाचे कौतुक केले.


‘विश्वमांगल्य सभा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष बप्पाजी जोशी यांनी बोलताना सांगितले, "अहिल्याबाई होळकर यांचे जीवन समर्पण, सेवा आणि न्यायाचे प्रतीक आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला भारतीय इतिहास आणि संस्कृतीची जाणीव होईल."


स्थानिक कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे या ऐतिहासिक घटकांना साकारले. भव्य रंगमंच, नेपथ्य आणि आधुनिक प्रकाशयोजनांमुळे नाटक आणखी प्रभावी बनले. आयोजकांनी सांगितले की, भविष्यात असे आणखी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, जे भारतीय समाजाला त्यांच्या सांस्कृतिक मुळांशी जोडतील.


कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कलाकारांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचे मनापासून कौतुक करत याला ऐतिहासिक वारशाशी जोडणारा अद्वितीय उपक्रम म्हणून गौरवले.

Comments

Popular posts from this blog

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

मुंबई-पालघर सागरी महामार्गाला मंजुरी! प्रवास होणार वेगवान