मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला ट्रक ड्रायवर ने फेकली केमिकल युक्त पावडर

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला ट्रक ड्रायवर ने फेकली केमिकल युक्त पावडर 

पालघर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील धानिवरी येथे ट्रक ड्रायवर ने केमिकल युक्त पावडर रस्त्याच्या कडेला फेकल्याचे प्रकार वारंवार घडत असतात.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील धानिवरी मानपाडा येथे रस्त्या लगत RJ 19 / GJ. 5959  या ट्रक ड्रायव्हर ने गाडीतुन केमिकल युक्त पावडर रस्त्याच्या कडेला फेकली होती हा सगळा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामंस्थानी लगेच जागेवर जाऊन टाकलेली केमिकल युक्त पावडर परत भरायला भाग पाडले. तसेच असे प्रकार खुप वेळा गावात घडलेले असल्यामुळे केमिकल मुळे नदीतील पाणी दूषीत होऊन नदीतील मासे मरतात तसेच नदीत रोज आंघोळ करण्यासाठी शाळकरी मुले, गावातील ग्रामस्थ जातात तर त्यांना अंगाला खाज येते आणि असे प्रकार याच्या अगोदर ही घडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला