उच्च न्यायालयच्या आदेशानंतर तहसीलदार सुनील शिंदे सक्रिय

 उच्च न्यायालयच्या आदेशानंतर तहसीलदार सुनील शिंदे सक्रिय



पाम गावाच्या बस स्टैंड जवलिळ अतिक्रमणावर चालवला बुलडोझर

क्राइम अलर्ट : स्वप्निल पिपले


पालघर. पाम गावातील गुरचरण जागेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांना अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत आदेश दिला आहे.


मौजे पाम स.नं. १६० सरकारी गुरचरण जागेवर ग्रामस्थांनकरिता गावठण मंजूर केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करून चाळ, दुकानाचे बांधकाम करून भाडे पट्यावर देण्याचे काम सुरू असल्याबाबत माजी सरपंच अशोक बाबू वडे यांनी अनेकवेळा तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी केल्या परंतु तक्रारीला टोलवाटोलवी करत असल्याचे समजताच वडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत writ petition no-7592/2014 च्या आधार घेत महाराष्ट्र शासन व इतर तीन विरूद्ध  contempt petition दाखल करत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांना चांगलाच दणका दिला आहे.


उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुनील शिंदे यांनी अतिक्रमण धारकांस दिनांक २५ मे पर्यंत अतिक्रमणे हटविण्यात मुदत देण्यात आली होती त्यातील एका अतिक्रमण धारकांने अतिक्रमण निष्कासित करण्यापूर्वी केलेला अतिक्रमण शासन दरबारी जमा केला व उर्वरित अतिक्रमणे दि २६ मे रोजी   एकूण 60 खोल्या व काही दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहे.


यावेळी तहसीलदार सुनील शिंदे, मंडळ अधिकारी अनिल वायाळ, तलाठी राऊत, ग्रामसेवक अल्पना पाटील, बोईसर पोलिस उपस्थित होते.


दरम्यान उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील अनेक गावातील गुलचरण जागेवर अतिक्रमणे करून त्याना विकण्याच काम जोरात चालू आहे यावर ही लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी लोकांन मध्ये चर्चे चा विषय झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी